You are currently viewing तू अन् मी

तू अन् मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तू अन् मी* ….

 

एकच छत्री, दोघे आपण..

टिपत जाऊ एकेक क्षण !

झरझरती जलथेंबाचे कण,

भिजवून जाती अपुले तनमन!…१

 

नाते आपुले मनामनाचे,

आहे धरती आकाशासम!

तव स्पर्शाने बहरून येते,

अंगोपांगी ते हिरवे पण !…२

 

हाताचा विळखा तना भोवती,

देई उबदार स्पर्श नवा!

वाट कधी ही संपूच नये,

श्वासातून घेऊ धुंद हवा!….३

 

चिंब मन अन् काया माझी,

गंध ओलेता मनी दरवळे !

ओल्या स्पर्शात धुंद होऊनी,

उष्ण स्पर्श अंतरी तो खेळे!…४

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा