*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिली साथ जरी चंद्राला*
दिली साथ जरी चंद्राला
सूर्यालाही रोज निरखते
नजर रोखून त्याच्यावरती
धाकात त्याला जरा ठेवते
उन कोवळे घेऊन मुखावर
नजर ठेवते त्याचे गतीवर
जाळी आडून खिडकीच्या
किरण कोवळे घेई अंगावर
प्रसन्न वदना होई तल्लीन
नेत्र तेजस्वी रोखून त्यावर
कळतही नाही दिवाकराला
लक्ष ठेवले त्याचे भ्रमणावर
रोज नहाते उन्हात कोवळ्या
जरी उगवला कितीही उशिरा
करुन नामस्मरण रवी राजाचे
पुण्य साठवते ती *चतुरा*
आहे तशी ती भोळी भाबडी
श्रध्दाळू आणि *फोटो वेडी*
घाटही देईल *साक्ष* वेडाची
गोदा वहाते जरी वेडीवाकडी
विनायक जोशी ✒️ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७