You are currently viewing दहावी, बारावी परीक्षेतील कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ रोजी गुणगौरव सोहळा

दहावी, बारावी परीक्षेतील कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ रोजी गुणगौरव सोहळा

*आमदार वैभव नाईक व कुडाळ युवासेनेच्या वतीने आयोजन*

 

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना कुडाळच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. रविवार २३ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न होणार असून आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अभय शिरसाट, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,नगराध्यक्षा अक्षता खटावकर,उपनगराध्यक्ष किरण शिंदे, श्रेया परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.तरी कुडाळ तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा