You are currently viewing नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भालावलच्या यश परबचा अर्चना घारेंडून सन्मान…

नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भालावलच्या यश परबचा अर्चना घारेंडून सन्मान…

नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भालावलच्या यश परबचा अर्चना घारेंडून सन्मान…

सावंतवाडी

भालावल गावातील कु.यश परब या युवकाने नॅशनल ज्युनिअर पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीप २०२४ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले‌. या चॅम्पियनशीपमध्ये त्याने ४ सुवर्ण पदके व स्ट्रॉंगमॅन टायटल जिंकले आहे. तसेच स्काॅटिंग स्पर्धेत २५५ कि.ग्रा. वजन उचलून नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांनी यश परबचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

श्री गंगानगर, राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत ७४ की. वजनी गटात महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करताना दैदिप्यमान यश यश परबने संपादीत केले आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने एकूण ६८० कि.ग्रा. वजन उचलून स्पर्धेत ४ सुवर्ण पदके व स्ट्रॉगमॅन टायटल त्याने जिंकले आहे. स्पर्धेदरम्यान त्याने स्काॅटिंग स्पर्धेत २५५ कि.ग्रा. वजन उचलून नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. यशच्या या कामगिरीनंतर भालावल येथील त्याच्या निवासस्थानी जात सौ. अर्चनाताईंनी कौतुक करत त्याचा सन्मान केला. शाल व श्रीफळ देऊन त्याचा यथोचीत सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या या यशात आई- वडीलांचा मोठा वाटा असल्याची भावना कु.यश परब याने व्यक्त केली.

सौ.अर्चनाताई म्हणाल्या, भालावल गावच्या या सुपुत्राचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. शिक्षणासाठी तो अंबरनाथ, ठाणे जिल्ह्यात आहे‌. शिक्षणासह तो आपला छंद जोपासत आहे. आजकाल तरूणाई व्यसनाकडे वळत असताना स्वतःच्या आरोग्याला महत्व देणारा यश सारखा तरूण इतरांसाठी आदर्शच आहे. जिद्द व चिकाटीने दैदिप्यमान यश मिळवून त्याने कोकणची मान उंचावली आहे अशी भावना कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली. यावेळी त्याचे वडील भरत परब, विनायक परब, अँड. सिद्धी परब, रामदास गवस, मयूर कामत ,वेद परब ,चंद्रशेखर परब, सिद्धेश परब,वैभव परब आदीसह भालावल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा