You are currently viewing मालवणात उमेदवारी अर्ज छाननीत एक अर्ज अवैध; भाजपच्या २ जागा बिनविरोध ?

मालवणात उमेदवारी अर्ज छाननीत एक अर्ज अवैध; भाजपच्या २ जागा बिनविरोध ?

मालवण :
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३७ अर्ज वैध तर १ अर्ज अवैध ठरल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, आडवली आणि कुणकवळे या दोन ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली.
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या ५४ जागांसाठी १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज छाननीत कुणकवळे ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला एक अर्ज अवैध ठरला. उर्वरित पाच ग्रामपंचायतीसाठीचे १३७ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी आहे.

भाजपच्या दोन जागा बिनविरोध ?

कुणकवळेमध्ये प्रभाग क्र. १ मध्ये ना. मा. प्रवर्गात सौ.शुभांगी सूर्यकांत मेस्री तर आडवली मध्ये
प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गात सौ. ज्योती योगेश लाड या भाजपच्या दोन उमेदवार बिनविरोध झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली. या दोन्ही सदस्यांचे भाजपच्या वतीने तहसिल कार्यालयाच्या आवारात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, उपसभापती राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण, दादा नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा