You are currently viewing पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा बहिष्कार…

पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा बहिष्कार…

पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा बहिष्कार…

सावंतवाडी

पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं.कर्मचा-यांनी बहिष्कार टाकत मतदानाचा हक्क बजाविणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. गटविकास अधिकारी काही ग्रामसेवकांच्या प्रशासनातील अनपढपणाला पाठीशी घालत असल्यामुळे तसेच अन्य गोष्ठींचे समर्थन करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटना अध्यक्ष हनुमान केदार व सचिव अशोक जाधव यांनी सागितले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक आज पार पडली या बैठकीत तालुक्पातील ग्रा.पं.कर्मचा-यांवर वारंवार सेवा – विषयक बाबींबाबत अन्याय केला जात आहे.यात काही ग्रामसेवक यांच्या प्रशासनातील अनपढपणामुळे चुकीचे निर्णयांचे समर्थन केले जात आहे.गट विकास अधिकार्‍यांकङे याबाबत तक्रार केली असता अशा कामचुकार ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात आहे.काही ग्रामसेवकांकङून प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन मागविले जाते.मग शासन यांना वेतन देते ते कशाच ? असा प्रश्न उपस्थित होतो कायद्यातील तरतुदींचा काही ग्रामसेवकांना अभ्यास नसल्याने असे प्रकार घङत आहे. खर म्हणजे काही ठिकाणी ग्रामसेवक कॅश बुक,मासिक सभा इतिवृत्त ,वर्गीकरण ही स्वत:ची कामे ग्रा,पं.कर्मचार्‍यांकङून लिहून घेतात,काही ठिकाणी पंचायत समिती मध्ये जातो असे सांगून आपल्या वैयक्तीक कामे करतात. मात्र गावात ग्रा.पं.कर्मचार्‍यांना याची उत्तरे द्यावी लागतात.
शासन निर्णयानूसार ग्रामसेवक यांनी मुख्यालयी राहाणे बंधनकारक असताना सुध्दा बर्‍याच ठिकाणी मुख्यालयी राहात नाही.गट विकास अधिकार्‍यांनी अशा संबधित ग्रामसेवकांवर कारवाई केली जात नाही.ग्रा.पं.कर्मचा-यांचे गट स्तरावरील तक्रारीचे निवारण केले जात नसल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून 26 जुन रोजी होणा-या पदवीधर निवङणूकीत पदवीधर ग्रा.पं.कर्मचारी यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा