केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सडूरे शिराळे नवलराज काळे यांच्या ग्रामपंचायतीतून मोठे मताधिक्य
वैभववाडी
*आमदार नितेश राणे साहेब यांच्या कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे नवलराज काळे यांच्या ग्रामपंचायतीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.
*नवलराज काळे ज्या प्रभागाचे सदस्य आहेत त्या शिराळे गावाच्या बूथ वर उ बा ठा गटाच्या विनायक राउत यांना 145 पैकी फक्त 04 मते.*
*मेरा बूथ सबसे मजबूत – नवलराज काळे*
*सविस्तर-*
लोकसभा निवडणुक 2024
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात च्या निवडणुकीत भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात सभा घेत प्रचारात आघाडी घेतली होती. दोन्ही जिल्हे फिरत असताना आपल्या होम पिचवर ज्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये देखील शिवसेनेला धूळ चारण्यात श्री नवलराज काळे व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे या दोन गावा मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना 535 पैकी 359 मते तर विनायक राऊत यांना 122 मते व इतर/नोटा यांना 54 मते पडली आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे मधून सन्माननीय राणे साहेब यांना 237 चे मताधिक्य मिळाले आहे. ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ही दोन गावांची एक ग्रामपंचायत असून या ठिकाणी दोन निवडणूक बूथ आहेत बूथनिहाय मतांची माहिती खालील प्रमाणे.
सडूरे बूथ – 390 पैकी
भाजप 227 (58.2 टक्के)
शिवसेना UBT 118 (30.2 टक्के)
इतर 45 (11.6 टक्के)
शिराळे बूथ 145 पैकी
भाजप 132 (91.0 टक्के)
शिवसेना UBT 04 (2.8 टक्के)
इतर 09 (6.2 टक्के)
या दोन्ही बूथचे सुपर वॉरियर म्हणून श्री नवलराज काळे यांच्या कडे जबाबदारी होती तर भाजप खांबाळे पंचायत समिती शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील या गावचे प्रभारी होते. भाजपा आमदार नितेश राणे,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तालुका अध्यक्ष नासिर काझी व सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने या बूथ वर काम करण्यात आले. शिराळे बूथ अध्यक्ष विजय पाटील, सडूरे बूथ अध्यक्ष सत्यवान डांगे, ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे चे सरपंच दिपक चव्हाण, उप सरपंच आनंद जंगम, शिराळे महिला बूथ अध्यक्ष अमृता पाटील, सडूरे महिला बूथ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्य दीक्षा रावराणे,विलास जंगम, रमाकांत रावराणे, विठ्ठल काटे, भाजप भटके विमुक्त आघाडी शिराळे बूथ अध्यक्ष विठ्ठल शेळके, भाजपा भटके विमुक्त आघाडी सडूरे बूथ अध्यक्ष रामचंद्र बोडेकर, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू जंगम,सखाराम पाटील, सुरबाजी पाटील, विजय रावराणे, लक्ष्मण शेळके, अंबाजी बोडेकर, राजेंद्र बोडेकर, रामचंद्र बोडेकर, गंगाराम शिंदे, संतोष पाटील, महेश डेळेकर, संतोष धामणे, कल्पना पाटील,विलास रावराणे, बाबुराव रावराणे, गोविंद भोसले (जामदार गुरुजी), संजय गायकवाड,प्रकाश रावराणे,मालती रावराणे, विक्रम सावंत, महादेव सावंत, अशोक चव्हाण, चंद्रकांत साटम, आबा डांगे, परशुराम डांगे, भास्कर सावंत, केशव राऊत सत्यवान काळे, बबन रावराणे, दशरथ पडवळ, नाना राणे, सागर मेजारी, संजय जंगम, लहू जंगम, डिके सुतार, विलास सावंत, उदय रहाटे,प्रमोद रावराणे,सचिन रावराणे,प्रभाकर राणे,विजय बोडेकर, मनोहर बोडेकर, आकाराम बोडेकर रामचंद्र बोडेकर जनार्दन काळे, मधुकर सावंत हेमा सावंत, मंगेश उर्फ बंटी राणे,रमेश जंगम यांसोबत अनेक सडुरे शिराळे येथील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी एकजुतीने काम करून हे मताधिक्य मिळवून दिले आहे त्याबद्दल वरील सर्व प्रमुख व्यक्तींचे व पक्षाच्या बूथ पदाधिकारी कार्यकर्ते यांचे नवलराज विजयसिंह काळे
जिल्हा अध्यक्ष भाजप भटके विमुक्त आघाडी
भाजप सुपर वॉरियर्स सडुरे शिराळे
तथा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आभार मानले आहे..
विधान सभेला या पेक्षाही जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू असा विश्वास ही काळे यांनी व्यक्त केला आहे.
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*
*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*
*📱संपर्क क्रमांक :*
*7057421082*
*9028466701*
*9420156771*
✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*