You are currently viewing पावसाळी भटकंती करताना काळजी घ्यावी

पावसाळी भटकंती करताना काळजी घ्यावी

*पावसाळी भटकंती करताना काळजी घ्यावी*

वैभववाडी

सह्याद्रीत पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडतात. पावसाळ्यादरम्यान सह्याद्रीमध्ये अत्यंत अल्हाददायक वातावरण असते. संपूर्ण सह्याद्री हिरवाईने नटलेला असतो, डोंगर द-यामध्ये मनमोहक धबधबे ओसंडून वाहत असतात. हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे गर्दीने तुडुंब भरलेली असतात.
परंतु पावसाळी भटकंती करत असताना ती अत्यंत काळजीपूर्वक करणेही तितकेच आवश्यक आहे. सह्याद्रीतील वाटा पाऊसामुळे निसरड्या होतात, दाट धुके आणि वाढलेल्या गवतामुळे वाट हरवते, घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे ओढे, नाले, धबधबे यांना मोठ्या प्रमाणात पाणी असते, कधी ढगफुटी सदृश पाऊस होऊन त्या परिसरातील ओढ्याना नद्यांना पूर येतो, गड किल्ल्यांवरील तटबंदीचे दगड निसटून दरड कोसळण्याचा धोका असतो या अशा अनेक धोक्यांपासून सावध राहून भटकंती करणे गरजेचे आहे. डोंगरावरील किंवा किल्ल्यावरील कडा असलेल्या भागात जाणे, फोटो काढणे टाळावे. मोठ्या धबधब्यांच्या प्रवाहात थेट प्रवेश करणे टाळावे. ओढे, नाले ओलांडताना प्रवाहाचा अंदाज नसल्यास ते ओलांडू नयेत.
सह्याद्रीमध्ये साहस नक्की करावे पण आतिसाहस करून धोका पत्करू नये. मुख्य म्हणजे पावसाळा किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये एकट्याने भटकंती कधीही करू नये. गिर्यारोहकांचे अनेक संघ आजवर सह्याद्रीमध्ये निस्वार्थपणे मदतकार्य करत आहेत. परंतु हे मदतकार्य करताना आतिसाहसामुळे दुखावलेल्या किंवा मृत पावलेल्या व्यक्तिंना बाहेर काढताना अत्यंत दुःख होते. गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंग आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संचालित महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू को ऑर्डनिशन सेंटर मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो गिर्यारोहक हे मदतकार्य एक सामाजिक बांधिलकी म्हणून करतात आणि हे मदतकार्य करत असताना कित्येकदा या स्वयंसेवकांना स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कार्य करावे लागते.
पावसाळ्यात सह्याद्रीतील भटकंती जरूर केली पाहिजे, कारण या ऋतूमध्ये सह्याद्रीच रूप हे अत्यंत मनमोहक असते. परंतु पावसाळी भटकंती अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. कारण सह्याद्रीतील निसरड्या वाटा, ढासळणार्या दरडी, धुके, धबधबे ओढ्यांचे तीव्र प्रवाह टाळले पाहिजेत. मानवी जीवन खूप अमूल्य आहे. हकनाक माणसे या ऋतूमध्ये मानवी चुकांमुळे मरताना दिसतात. अतिसाहसी किंवा अतिरेक न करता आणि सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे, सचिव डॉ.राहुल वारंगे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने केले आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा