You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

*वैभववाडी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ व मालविया मिशन टिचर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ व १५ जून २०२४ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्हातील विविध महाविद्यालयातील संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, तसेच विविध शासकीय व निमशासकीय, खाजगी संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील प्रत्येक घटकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती देण्यासाठी स्वतंत्र सत्रांचे नियोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.आर. डी. कुलकर्णी, प्रो. रवींद्र बांबर्डेकर (प्राचार्य – मॉडेल कॉलेज, डोंबिवली), प्रो. माधव राजवाडे (प्राचार्य – साठे कॉलेज) प्रो. हिरेन दंड (HOD IT-MCC. University of mumbai). यांनी सविस्तर मार्गदर्शन करून विविध शंकांचे व विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन केले.
सध्याच्या औदयोगिक क्षेत्राला आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्याची क्षमता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असल्याचे नमुद केले. तसेच हे धोरण विध्यार्थ्यांचा सर्वागिण विकास करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडेल, असेही ते पुढे म्हणाले. सदर धोरणांच्या अंमलबजावणी संदर्भातील तयारी मुंबई विद्यापीठाने केली असून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू करण्यात आल्याचे कुलगुरु मा.रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाराणा प्रतापसिह शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालक मंडळ, स्थानिक समितीचे अध्यक्ष व संचालक मंडळ, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, कार्यशाळा समन्वयक सहा. प्रा. एस. बी. पाटील, महाविदयालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा