You are currently viewing शब्दांना….राग माझा…!

शब्दांना….राग माझा…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दांना….राग माझा…!*

 

प्रतिमा प्रतिके अंगिकारता

शब्दचं अंगचोरून घेती

कविता रूपधारण करताच

ललितगद्याशी नात सांगती…

 

कवितेतला आत्मनिष्ठ अनुभव

मी पात्रांतून सांगतो

वाच्यार्थ शब्दांना टाळून

प्रतिमायुक्त रूपात मांडतो..

 

भाषावृत्ती अनुभवातून लाभली

लयबद्धतेचा स्पर्श अंगीकारला

शब्दांनाच राग माझा

इतरांपासून वेगळा केला..

 

काव्यात्म अनुभव आत्मनिष्ठेला

अंतर्मुखतेकडे घेऊन गेले

विद्रोही शब्दांचा जल्लोष

साहित्यविश्वातून बाहेर केले..

 

वशिल्याचा शब्द टाक

लेखणी काही धजेना

शब्दांना राग …माझा

स्वाभिमान काही सुटेना..!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा