You are currently viewing जाणून घ्या बाबांना

जाणून घ्या बाबांना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जाणून घ्या बाबांना*

—————————————-

एक विनंती हो सगळ्यांना

जाणून घ्या आपल्या बाबांना ।।

 

हक्काने मागतो जे बाबांना

सोपे नसते सारेच बाबांना

पुरवती लेकराचे हट्ट सारे

सारे काही जमते बाबांना

 

असतात अडचणी बाबांना

कळू देत नाही ते लेकरांना

कमी पडतो आपण सदा

समजून घेण्यास बाबांना ।।

 

ओझे जबाबदारी अवजड

कणखर बाबांना ना अवघड

परिवारासाठी त्यांची धडपड

कुटुंब त्यांचे त्यांचा हो गड ।।

 

हवे असते ते मिळे पर्यंत

गोड बोलती लेकरे बाबांना

जाणून घ्या मनातले त्यांच्या

कृतीतून दाखवा हो बाबांना ।।

 

एक विनंती हो सगळ्यांना

जाणून घ्या आपल्या बाबांना ।।

——————————————-

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

——————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा