You are currently viewing अंगावर लोखंडी ब्लॉक पडल्याने देवगडात कामगाराचा मृत्यू…

अंगावर लोखंडी ब्लॉक पडल्याने देवगडात कामगाराचा मृत्यू…

अंगावर लोखंडी ब्लॉक पडल्याने देवगडात कामगाराचा मृत्यू…

देवगड

फरशा बसवण्याचे काम करत असताना अंगावर लोखंडी ब्लॉक पडल्यामुळे परप्रांतिय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देवगड येथे घडली. अवधेश राजभवन कुमार (वय ३०) असे त्या कामगाराचे नाव आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तेथील प्रदीप मांजरेकर यांच्या घरात तो फरश्या बसवण्याचे काम करत होता. यावेळी हा अपघात घडला. त्याच्या पोटावर हा लोखंडी ब्लॉक पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली अधिक उपचारासाठी त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. तो मूळचा सुलतानपूर-उत्तर प्रदेश येथील आहे. कामासाठी तो काही दिवसापूर्वी या ठिकाणी आला होता. याबाबतची खबर त्याचे नातेवाईक सुखराम गौतम यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा