You are currently viewing पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत

पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत

*पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत*

*कणकवली विजय भवन येथे शिवसेना, इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न*

एकही रुपया न देता ४ लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्या मतदारांशी आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे. मी निवडणुकीत विजयी झालो नाही म्हणून पळून जाणारा नाही. आता खासदार नसलो तरी देखील त्याच आपुलकीने आपल्या सुखदुःखात सामील होणार आहे. कणकवली मतदारसंघासहित संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा नेता म्हणून मातोश्रीचा सच्चा शिलेदार म्हणून यापुढे तसाच कार्यरत राहणार आहे.पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आताच्या पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा.येणाऱ्या निवडणूकित आपल्याला विजय मिळविल्याशिवाय शांत बसायचे नाही असे आवाहन शिवसेना नेते मा. खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीत केले.

कणकवली विजय भवन येथे शिवसेना नेते मा. खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी सायंकाळी शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.आपल्याला मतदान केलेल्या मतदारांचे श्री. राऊत यांनी प्रथमतः आभार मानले. दरम्यान शिवसेना इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख,उपनेते अरुण दूधवडकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,कोकण उपनेत्या जान्हवी सावंत, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, निलेश गोवेकर,प्रवीण वरुणकर,बाळा भिसे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, सौ.कोलते, सौ.दळवी, सौ.मेस्त्री, महेश कोदे,आनंद ठाकूर,जयेश धुमाळे,उत्तम लोके, अजु मोर्ये, निसार शेख,सचिन सावंत, राजू रावराणे,मंगेश सावंत, रुपेश आमडोस्कर,सचिन आचरेकर,गुरु पेडणेकर,तेजस राणे, सिद्धेश राणे, सुजित जाधव,वैभव मालंडकर,जगन्नाथ आजगावकर,महादेव राठोड,तात्या निकम,छोटू रावराणे,राजू पावसकर,प्रतीक रासम,धीरज मेस्त्री आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा