डॉ. चंद्रकांत सावंत यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड
ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक व समाजकार्य क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची दखल घेऊन त्यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. वर्ल्ड कान्फ्रेंसिंग काॅन्स्टीट्यूएशन अँड पार्लमेंट असोसिएशन ( डब्ल्यूसीपीए ) जागतिक संविधान व संसद संघाच्यावतीने श्रीरामपूर येथील कार्यक्रमात डॉ चंद्रकांत सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्डसाठी निवड झाली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्लूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे, हमाल साहित्यिक आनंदा साळवे, एस टी महामंडळाचे नवनाथ गवळी, संपादक स्वामीराज कुलथे, पत्रकार सुनील पाटील, ज्येष्ठ कवी रज्जाक शेख, राष्ट्रपती पदक विजेत्या मोनिका शिंपी, जेष्ठ कवयित्री मंजूषा ढोकचौळे, डॉ शैलेंद्र भणगे, सी के भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार विजेत्यास वर्ल्ड पार्लमेंटचे अर्थात जागतिक संसदेचे सदस्यत्व मिळणार असून सोबत जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच वर्ल्ड पार्लमेंटच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून कलागुण आणि कार्य सातत्याने आणि कायमस्वरूपी सादर करण्याची संधीही मिळणार आहे.
यातील गुणी व अभ्यासू सदस्यांना डब्ल्यू सी पी ए च्या राज्य राष्ट्रीय आणि ग्लोबल कार्यकारणीवर काम करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कार व अनुदान मानधन योजना विषयी योग्य ते मार्गदर्शन व मदत करण्यात येईल.
डॉ चंद्रकांत सावंत यानी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ७९ शाळांमधील १३१ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत ४ लाख १० हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १३१ मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच डॉ चंद्रकांत सावंत यांनी गेली दोन दशके विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज डॉ चंद्रकांत सावंत यांनी स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले.
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*