*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लगोरी लावतो पुस्तकांच्या*
पिढ्यान् पिढ्या आंम्ही
रचतो लगोरी ज्ञानाच्या
उमटवून अक्षरे कागदावर
लगोरी लावतो पुस्तकांच्या
माहीत नाही अजून आम्हाला
उपयोग करतात याचा किती
किती पडली बळी झाडे
व्हायला यांची एवढी निर्मिती
शोध लागून दिवस उलटले
इ बुक्स येऊन गॅझेटवरती
अजून कां हो सरकार झोपले
कोटींची होई बुक निर्मिती
मुखात नाही पाणी अजुनही
किती कोटी जनतेच्या
रचला जातोय ढीग आज
उद्या होणाऱ्या तरी रद्दीचा
चंद्रावरती करून बुकिंग
विश्वविद्यालये झाली सुरू
आम्ही छापतो अजून पुस्तके
कोण चाटणारे *गुरू*?
बंद करा ती आता छपाई
उपलब्ध आहेत संगणकात
वृथा तोडता झाडे करोडो
पैसा वेळही जातो पुस्तकात
पेपरलेस ती व्यवस्था सारी
खुणावत आहे सर्वांना
दडलंय ज्ञान संगणका पोटी
ज्ञात आहे ते राजकारण्यांना
फुकट कमाई बगल बच्च्यांची
सोय करते *शिक्षण लाॅबी*
सोकावले ते शिक्षण सम्राट
कुठे जपतायत वाचन हाॅबी
विनायक जोशी✒️ ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७