You are currently viewing “प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी!

“प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी!

*”प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी!”*

पिंपरी

“प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी असते!” असे विचार शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी शनिवार, दिनांक १५ जून २०२४ रोजी रंगोली हॉल, चिंचवड येथे व्यक्त केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उज्ज्वला ढमढेरे लिखित ‘हरिबंध’ या कवितासंग्रहाचे आणि ‘रत्नांजली’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन करताना नाना शिवले बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, साहित्यिक श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे आणि कवयित्री उज्ज्वला ढमढेरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

नाना शिवले पुढे म्हणाले की, “शब्दांची पूजा करणार्‍या व्यक्तींचे जीवन नेहमी समृद्ध असते. उज्ज्वला ढमढेरे यांच्या कविता हृदयस्पर्शी आहेत!” किसनमहाराज चौधरी यांनी, “प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असला पाहिजे तरच तो विद्यार्थ्यांमधील राजहंस ओळखणारा आदर्श शिक्षक होतो!” असे मत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी, “कवितेला वेदकाळापासूनची प्राचीन परंपरा लाभली आहे. करोना काळात उज्ज्वला ढमढेरे यांनी सामाजिक जाणिवेतून काव्यलेखन केले. काव्यसंग्रहात समाविष्ट असलेल्या त्यांच्या शंभर कविता या जणू शंभर नंबरी सोने आहेत!” असे गौरवोद्गार काढले. राजेंद्र घावटे यांनी, “कविता हा सर्जनशील मनाचा हुंकार असून ‘हरिबंध’मधील कविता कुसुमाग्रजांच्या शैलीची आठवण करून देतात!” अशी मीमांसा केली.

कवयित्री उज्ज्वला ढमढेरे यांनी मनोगतातून, “शालेय वयात वाचनातून रसग्रहण करण्याची आणि कवितालेखनाची आवड निर्माण झाली. अल्पशिक्षित आजीला मौखिक काव्यनिर्मितीचे वरदान लाभले होते. ‘हरिबाई’ या तिच्या नावाची स्मृती म्हणून ‘हरिबंध’ आणि आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नांजली’ या संग्रहांची निर्मिती झाली आहे. कवितालेखनाने खूप आनंद दिला; तर अध्यापन करताना विद्यार्थ्यांना कवितावाचनाची दृष्टी देऊ शकले, याचे समाधान वाटते!” अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. दिलीप गरुड यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “लेखनसाधना ही कष्टसाध्य कला आहे. ‘हरिबंध’ या संग्रहातील कविता सुबोध आणि गेय आहेत!” असे प्रतिपादन केले.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि ईशस्तवन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ज्योती तापकीर आणि वंदना इन्नाणी यांनी ‘हरिबंध’मधील कवितांचे अभिवाचन केले. संभाजी ढमढेरे, शिवाजी ढमढेरे, रवींद्र चव्हाण, अनंत हरसोळे, शंकर विचारे, राजवर्धन शितोळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राधिका भोईटे आणि सुनीता तिकोने यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा