You are currently viewing कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कुडाळ :

 

जून महिना आला की चाहूल लागते शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून रोजी सुरू होणारी शाळा अलिकडे १५ जून रोजी सुरू होत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात. त्यांना विविध भेटवस्तू, स्वागताची रांगोळी, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते, त्यालाच शाळा प्रवेशोत्सव असे म्हटले जाते.

कुडाळ येथील के एम एस पी मंडळ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये १५ जून २०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय परिसरात सुशोभीकरण तसेच प्रवेशद्वार सुस्वागतमच्या सुंदर रांगोळीने सजवून विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका मुमताज शेख मॅडम, चिंदरकर मॅडम, मयेकर मॅडम, धुरी मॅडम, मोहिनी मॅडम, गार्गी मॅडम, सिध्दी मॅडम, शेख सर, वेंगुर्लेकर सर आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य आणि शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा