You are currently viewing कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत नवीन विद्यार्थांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न

कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत नवीन विद्यार्थांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर शिक्षण प्रसारक मंडळाची विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यामंदिर प्राथमिक विभाग सेमी माध्यम या तिन्ही संकुलात नुतन विद्यार्थ्यांचा वाजत गाजत शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

शालेय परिसरात सुशोभिकरण करून प्रवेशद्वार सुस्वागतमच्या सुंदर रांगोळीने सजवून बालवाडी ते दहावी पर्यंतच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून स्वागत करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक श्री. पी. जे कांबळे, पर्यवेक्षिका सौ.जाधव मॅडम, जेष्ठ शिक्षक श्री.वणवे, सौ करंबेळकर, सौ.राणे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी गुलाब पुष्प देवून व मोतीचूर लाडू वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

संस्था पदाधिकारी यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच माध्यमिक प्रशालेत नविन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात आलेली मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापक श्री. पी .जे .कांबळे आणि जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष मा.तवटे साहेब, चेअरमन डॉ .सौ सांळुंखे, सचिव मा विजयकुमार वळंजू यांनी नविन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा