कुडाळ:
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हिर्लोक, संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. दिनांक १५ जून २०२४ रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. यावेळी पाचवी ते दहावी इयत्तेमध्ये अनेक नवीन विद्यार्थ्यांनी २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतला. या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक श्री दिनेश माडगूत सर शिक्षिका घाडी मॅडम, राणे मॅडम, शिक्षक तांबे सर, नाईक सर, विणकर सर, केळुसकर सर ढाकरे सर, शिंदे सर, डवर सर आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात या प्रशालाने जिल्ह्याभरात आपल्या ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा तालुका स्तरावर माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्रशालिनी पटकावला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रशालेत सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये देखील प्रशालेचा नेहमी सहभाग असतो. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के यशाची परंपरा कायम ठेवत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर प्रशालेने आपले सुवर्णक्षरात कोरले आहे. त्यामुळे पंचक्रोशीत प्रशालीचा नावलौकिक वाढला असून यावर्षी अनेक नवीन विद्यार्थ्यांनी प्रशालेत प्रवेश घेतला आहे.