You are currently viewing कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत*

सावंतवाडी

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या प्रशालेमध्ये नवीन प्रवेशित झालेल्या नवगत विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर व शिक्षक यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन प्रशालेत स्वागत करण्यात आले.
यावेळी शासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरणही प्रशालेमधील उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आलेत.
प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर यांनी शाळेतील नियोजनबद्धता, कार्यप्रणाली,शाळेत घेतले जाणारे शैक्षणिक उपक्रम,शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा स्वरूप इत्यादी समजावून सांगितले. व शैक्षणिक वर्ष – 2024-25 सत्रासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्यात.
या नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ वेळी प्रशालेच्या सभागृहामध्ये प्रशालेचे जुने विद्यार्थी,नवगत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा