You are currently viewing रक्तदाता दिनानिमित्त वेंगुर्ल्यात भाजपकडून रक्तदात्यांचा सन्मान…

रक्तदाता दिनानिमित्त वेंगुर्ल्यात भाजपकडून रक्तदात्यांचा सन्मान…

रक्तदाता दिनानिमित्त वेंगुर्ल्यात भाजपकडून रक्तदात्यांचा सन्मान…

वेंगुर्ले

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने येथील भाजपाच्या माध्यमातून तालुक्यातील रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. वेताळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली काही वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये बहुआयामी काम करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानने गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २५ रक्तदान शिबिरे घेऊन आपली सामाजिक समरसता जपली. याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस या संस्थेचा विशेष सन्मान तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा सन्मान प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परुळकर यांनी स्वीकारला.

यावेळी जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने वेळोवेळी रक्तदान करणाऱ्या प्रातनिधिक रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी २९ वेळा रक्तदान करणारे वेताळ प्रतिष्ठानचे खजिनदार माधव तुळसकर, शेखर काणेकर, सुधीर पालयेकर, रक्तदान शिबीर आयोजनात अग्रणी असणारे किरण भालचंद्र राऊळ यांचा भाजपाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी रक्तदान शिबिरात आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत सातत्याने रक्तदान करत रहा आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन केले, तसेच त्यांनी रक्तदान चळवळीचे महत्त्व विशद केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर ,ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, किरण कुबल, जयंत मोंडकर, सुरेंद्र चव्हाण, बुथ अध्यक्ष रवी शिरसाट व राजन केरकर, छोटू कुबल उपस्थित होते .

संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा