You are currently viewing पैसा..

पैसा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पैसा…*

 

माया अर्थात ममता

म्हणजेच प्रीत होती…

ओढून अर्थ-चादर

झाली पैसा वा संपत्ती…// १ //

 

जनजन उतावीळ

हपापले पैशासाठी…

गेले विसरून जैसे

नातीगोती बंधगाठी…// २ //

 

पैसा अमाप, भरतो

दर्पाशिवाय न दुजे…

माये समोरी जयाचे

मोल कैसे खुजे-खुजे…// ३ //

 

पैसा खर्चून कुठे ती

मिळते का? हो ममता…

माया वस्तू ना ती, लागे..

जिचा तो मोल कोणता…// ४ //

 

पैसा.. धन तामसाचे!

भरे दंभ, हरे प्रीती…

मीपणा भरून माथी

हरे मती, करे अती…// ५ //

 

पैसा धन वा संपत्ती

देते जरी खूपकाही…

‘फुंकर मायेची’ कशी

खरेदून देत नाही…// ६ //

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा