You are currently viewing माहेर

माहेर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

*माहेर*

 

माहेराच्या आठवांत

मन डोलावून जाई

दिवे लागणीस सांजे

आठवते माझी आई

 

माहेराचे घरकुल

ओढ लाविते जीवाला

भाऊराया उभा दारी

बहिणीच्या स्वागताला

 

सागराच्या किनाऱ्यास

गाव रेडी वसलेले

माझ्या मायेचे माहेर

निसर्गाने सजलेले

 

दंगामस्ती करण्यात

पटाईत माझे नाव

हट्टी स्वभावाने रोज

मार मिळायचा राव

 

रम्य बालपण माझे

गेले आईच्या कुशीत

भावंडांच्या संगतीने

खेळ खेळले खुशीत

 

पुरविले हट्ट लाड

आईबाबा भावंडांनी

दिला आकार जीवना

अनमोल संस्कारांनी

 

*🖊️© सौ. आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा