You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्टयाचा चव्वेचाळीसावा मासिक कार्यक्रम

साहित्य प्रेरणा कट्टयाचा चव्वेचाळीसावा मासिक कार्यक्रम

*साहित्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे साहित्यिक विनय सौदागर यांचे आवाहन*

 

आजगाव:

गेली जवळपास चार वर्षे साहित्याचा आनंद लुटण्यासाठी आजगाव ता.सावंतवाडी येथे साहित्य प्रेरणा कट्टाच्या माध्यमातून साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर आणि त्यांचे सहकारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी न चुकता विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवार दिनांक १६ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत आजगाव मराठी शाळेजवळ “पावसाळी कविता” या विषयांतर्गत कविता सादरीकरण व कवितेचे रसग्रहण अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

     या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे सदस्य तसेच उपस्थित काव्यप्रेमी *पाऊस* या विषयावरील कविता सादर करतील. या कविता स्वरचित किंवा प्रथितयश कवींच्या असतील. सोबत त्या कवितेचे रसग्रहण देखील करतील. 

      तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण जरूर उपस्थित रहावे, अशी विनंती कट्ट्याचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 

विनय सौदागर, आजगाव

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा