You are currently viewing तळकट कोलझर पुलाचे काम अतिशय संथगतीने..

तळकट कोलझर पुलाचे काम अतिशय संथगतीने..

तळकट कोलझर पुलाचे काम अतिशय संथगतीने..

एसटी सेवा बंद ; विद्यार्थी व प्रवाशांचे प्रचंड हाल.

दोडामार्ग

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मधून कोट्यवधी रुपये खर्च करून तळकट कोलझर गावा दरम्यान नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम संत गतीने सुरू आहे. या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने मुदतीत पूर्ण केले नाही. तसेच आता सुरू झालेल्या पावसामुळे पर्यायी रस्ता देखील दलदलीत झाला आहे.त्यामुळे या मार्गावर एस टी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.पुलाच्या पलीकडे तळकट येथून बसेस माघारी फिरत आहेत त्यामुळे चार ते पाच गावातील ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी यांना बेजबाबदार अधिकारी ठेकेदार यांच्या निष्काळजीपणा मुळे चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की,तळकट कोलझर पुलाचे काम उशिराने सुरू करण्यात आले.मुळ ठेकेदार कडून हे काम दुसऱ्या ठेकेदाराने घेतले आणि पुढे पाऊस आहे. त्यामुळे नियोजित वेळेत पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे याची काळजी संबंधित ठेकेदाराने घेतली नाही आणि कासवाच्या गतीने काम सुरू केले. यात सदर ठेकेदाराकडे पुरेशी मशिनरी नाही त्यामुळे हे काम लांबत गेले पाऊस सुरू झाला तरी ठेकेदार पुलाचे स्लॅब टाकण्याचे काम हाती घेतले.मात्र हे काम वेळेत पूर्ण होणार नाही मग घाईगडबडीत बांधकाम खात्याने हाती घेण्याची गरज का? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी विचारला आहे. कोट्यावधीचा निधी खर्च करूनही पुलाची उंची व रुंदी वाढविल्याची दिसत नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ नही या पुलाचे काम अत्यंत संत गतीने व दर्जेदार नसल्याचे प्रथमता दिसून येते या सर्व बाबींचा विचार करता प्रवासी व विद्यार्थ्यांना अजून बरेच दिवस या पुलावरून वाहतूक करणे शक्य नाही त्यामुळे बांदा, तळकट, उगाडे ,कळणे कोनाळ मार्गे बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी व पालक यांचे कडून होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा