वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयितांना अटक ; १९ जून पर्यंत पोलीस कोठडी मुख्य संशयीताचा शोध सुरू
देवगड
वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना देवगड पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रणव राजन नारिग्रेकर व हरीश दिलीप आचरेकर अशी या दोन संशयीतांची नावे आहेत. या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीस विरार येथून ताब्यात घेतली असून त्याला शनिवारी देवगड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे. अशी माहिती देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.
देवगड तालुक्यातील वाडा येथे बंद घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून घरातील रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याची घटना वाडा भटवाडी येथे घडली दिनांक १६ मे ते ६ जून या कालावधी ही चोरीची घटना घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी वय ६५ राहणार वाडा भटवाडी या १६ मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. त्या घराच्या बाहेर परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते तेही २९ मे रोजी मुंबईला गेले होते. ते मुंबईहून परत आल्यानंतर ६ जून रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या घरी गेल्यानंतर घराच्या मागील दरवाजा फोडलेला दिसला त्यांनी याबाबत वैशाली घाडी यांना फोनवरून कळविल्यानंतर त्यांनी त्या वाडा येथे गावी आल्या. व त्यावेळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजा फोडून चोरट्याने आत प्रवेश करून रोख रक्कम दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव,आशिष कदम, स्वप्निल ठोंबरे,यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमने ही भेट देऊन तपासाला सुरुवात केली होती.
याबाबतची सविस्तर तक्रार देवगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली.
या चोरीमध्ये अज्ञात चोरट्याने बंद घराच्या मागील दरवाजा फोडून एकूण ५ लाख ५५ हजाराची चोरी झाली असल्याचे माहिती फिर्यादी वैशाली घाडी यांनी पोलिसांना दिली असून यामध्ये ४० हजार किमतीचे ३ तोळ्याचे मंगळसूत्र, २५ हजार किमतीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र, २५ हजार किमतीची २ तोळ्याची पीळ असलेली चैन, १५ हजार किमतीच्या ५ सोन्याच्या अंगठ्या यामध्ये ५ ग्रॅमची एक व ३ ग्रॅमच्या ४ अंगठ्या , १० हजार किमतीचे ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले व १ ग्रॅम सोन्याची पट्टीतील नथ, ४० हजार किमतीचे चांदीचे ब्रेसलेट व कंबर साखळी अशी पाव किलो चांदी, ४ लाखाची रोकड यामध्ये ५०० रुपयांच्या ४०० नोटा, १०० रुपयांच्या १ हजार नोटा, २०० रुपयांच्या ५०० नोटा असा या चोरीतील नोटांचा तपशील आहे.असे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून १ लाख ५५ हजार किमतीचे दागिने व ४ लाखाची रोकड असे मिळून एकूण ५ लाख ५५ हजाराची चोरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून केली.या अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वि कलम ३८०,३५७ अन्वये देवगड पोलिसात पुन्हा दाखल केला होता.
त्यानुसार देवगड पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने तपासाची चक्रे फिरविली. मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या चोरी प्रकरणातील प्रणव राजन नारिग्रेंकर (२६) मूळ राहणार इळये पाटथर, सध्या राहणार पितृछाया अपार्टमेंट राम मंदिर जवळ जुने डोंबिवली, हरीश दिलीप आचरेकर (१९) मूळ राहणार वाडा आचरेकरवाडी सध्या राहणार वाफी गुजरात, या दोन संशयित युवकांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले. ४००० रुपये किमतीचा कॅनोन कंपनीच्या कॅमेरा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांना गुरुवारी रात्री देवगड पोलीस स्थानकात आणण्यात आले. शुक्रवारी त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मुख्य संशयित हा वाडा गावातीलच असून त्यालाही देवगड पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी विरार येथून ताब्यात घेतले आहे. शनिवारी देवगड पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात येणार आहे अशी माहिती देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*