You are currently viewing मनसेच्या निबंध स्पर्धेत सावंतवाडीचा किशोर वालावलकर प्रथम…

मनसेच्या निबंध स्पर्धेत सावंतवाडीचा किशोर वालावलकर प्रथम…

मनसेच्या निबंध स्पर्धेत सावंतवाडीचा किशोर वालावलकर प्रथम…

कुडाळ

मनसेच्या माध्यमातून आयोजित निबंध स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. या स्पर्धेत सालईवाडा सावंतवाडी येथील किशोर अरविंद वालावलकर याने प्रथम क्रमांक पटकावला. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी खुली निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यात प्रथम किशोर अरविंद वालावलकर (सावंतवाडी) , विषय > बिल्डर शहराचे विकासक की भकासक, द्वितीय सौ. आर्या आनंद बागवे (हुमरमाळा-कुडाळ) विषय- बिल्डर शहराचे विकासक की भकासक, तृतीय क्रमांक- नियोजिता अनिल नाईक (माजगाव-सावंतवाडी) विषय-सांडपाणी व्यवस्था भविष्यातील शहरांची डोकेदुखी.

या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकाला ३ हजार ३३३ आणि चषक,, द्वितीय २ हजार २२२ आणि चषक, तृतीय १ हजार १११ आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, विद्यार्थी सेना यतीन माजगावकर, विभाग अध्यक्ष शैलेश हडकर, माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, अक्षय जोशी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा