You are currently viewing डोईजड

डोईजड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*डोईजड*

 

सारेच डोईजड

झाले आता वातावरण

स्वैर आचरण

समाजात…

 

संस्कार परंपरा

पाळायला ठरतात डोईजड

असतो आधारवड

समाजाचा…

 

अभ्यास डोईजड

दप्तराच्या भाराने वाकली

मुले थकली

ओझ्याने….

 

डोईजड होतात

माता पिता वृद्ध

घडवतात समृद्ध

मुलांना….

 

डोईजड होतोय

पर्यावरणाचा भयंकर विनाश

आवळले पाश

आयुष्याचे…..

 

डोईजड झाले

समाजातील कृत्रिम वागणे

आश्चर्य वाटणे

नसेच…..!!

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा