You are currently viewing राष्ट्रीय शैक्षणिक धोरण माहितीसाठी १८ पासून मालवणात कार्यशाळा…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण माहितीसाठी १८ पासून मालवणात कार्यशाळा…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण माहितीसाठी १८ पासून मालवणात कार्यशाळा…

मुंबई विद्यापीठाचे स का पाटील महाविद्यालयात आयोजन..

मालवण

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने मुंबई विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रात कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यातील सिंधुदुर्ग जिल्हयाची कार्यशाळा विद्यापीठातर्फे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १८ आणि १९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व्यवस्थापन मंडळ, विद्यार्थी, पालक तसेच विविध व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक संस्था. आदी सर्व घटकांची महत्वाची भूमिका असणार आहे. याबाबत वेगवेगळ्या सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, कॉमर्स विभागाच्या डीन डॉ. कविता लघाटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, कॉमर्स आणि में नेजमेंट विभागाचे असोसिएट डीन डॉ. रविकांत सांगुर्डेकर हे सर्व तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी लिंकवर पूर्वनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही नोंदणी निःशुल्क आहे. सत्रांची वेळ अशी आहे. १८ जून रोजी सकाळी. १० ते १२ प्राचार्य व प्राध्यापक, दुपारी १२ ते २ विद्यार्थी, ३ ते ५ पालक, १९ जून रोजी सकाळी १० ते १२ कॉलेज व्यवस्थापन सदस्य / प्रतिनिधी, दुपारी १२ ते २ उद्योजक, व्यावसायिक, संस्था, समाजसेवक, इत्यादी, दुपारी ३ ते ५ प्रशासकीय कर्मचारी वर्ग.

जिल्हयातील सर्व महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, पालक, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, व्यवस्थापन सदस्य या सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करून या कार्यशाळेस उपस्थित राहवे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांनी केले आहे. या कार्यशाळेबाबत डॉ. उज्वला सामंत यांच्याशी ९४२१२६१४३९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा