You are currently viewing जेसीबी अपघातातील युवकाच्या मृत्यूप्रकरणी जेसीबी चालकास अटक

जेसीबी अपघातातील युवकाच्या मृत्यूप्रकरणी जेसीबी चालकास अटक

जेसीबी अपघातातील युवकाच्या मृत्यूप्रकरणी जेसीबी चालकास अटक

पोट ठेकेदारावरही गुन्हा दाखल

सावंतवाडी

जेसीबीच्या धडकेत जखमी होऊन मृत्यू पावलेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जेसीबी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहन बहादूर राठोड ( ३३, रा. देवरहिपरी बिजापूर, कर्नाटक ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोटठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सावंतवाडी शहरातील खासगीलवाडा परिसरात राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी मनिष महादेव देसाई हा आपलं निकाल पत्र आणण्यासाठी महाविद्यालयात जात असताना जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणा मुळे जेसीबीच्या मागच्या दातांचा धक्का बसून गंभीर जखमी झाला होता. यात सदर युवकाचा गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संबंधित जेसीबी चालकावर या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, सदरच्या अपघातानंतर त्याने पोबारा केला होता.

दरम्यान, हे काम सुरु असताना त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा अपघात झाला याप्रकरणी काम करणाऱ्या संबंधित पोट ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदोष मनुष्य वधाचे वाढीव कलम लावावे अशी मागणी मृत युवकाच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन केली होती.

त्यानंतर या अपघात व मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी हे वाढीव कलम लावले आहे. तर याप्रकरणी पोट ठेकेदारावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला सहआरोपी केला आहे. तर जेसीबी चालक मोहन बहादूर राठोड याला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जातं आहे.

ज्या कामाच्या ठिकाणी हा अपघात घडला त्या कामाचा मुख्य ठेकेदार व अन्य कोणी सहभागी संशयित यांचा समावेश असल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. सध्या संशयिताकडून माहिती घेतली जात असून बांबोळी गोवा येथे रुग्णालयात मयताचा अहवाल आणण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी गेले आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती तपासी अधिकारी सरदार पाटील यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा