You are currently viewing शहरातील सबनिसवाडा परिसरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयितांवर टेहळणी

शहरातील सबनिसवाडा परिसरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयितांवर टेहळणी

शहरातील सबनिसवाडा परिसरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयितांवर टेहळणी

शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीचा तपास करण्यास अडथळे

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील सबनिसवाडा परिसरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयितांवर टेहळणी ठेवली आहे. मात्र आज कोणालाही अटक अगर ताब्यात घेण्यात आले नाही. दरम्यान शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीचा तपास करण्यास अडथळे येत आहेत असे बोलले जात आहे.

सावंतवाडी शहरातील सबनिसवाडा परिसरात दोन अपार्टमेंट मधील ४ फ्लॅट चोरट्यांनी फोडून कपाटातील कपडे विस्कळीत केले. एकाच फ्लॅट मधील १० हजार रुपयांवर चोरांनी डल्ला मारला. एकाच रात्री चोरांनी घातलेल्या धुमाकूळाने पोलिस खडबडून जागे झाले आहेत.
या खोल्या बंद असल्याचे माहीती असलेल्या संशयीताचा सहभाग असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी दोघे संशयीत पोलिसांच्या नजरेत आहेत. मात्र कोणालाही ताब्यात घेतले नाही असे पोलीस निरीक्षक तानाजी नरनावर यांनी बोलताना सांगितले.

शहरातील सबनीसवाडा भागातील वरद अपार्टमेंट आणि नूतन गृहनिर्माण सहकारी संस्था अशा दोन इमारतीमधील एकूण चार बंद असलेले फ्लॅट व एक रो हाऊस अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडले यातील वरद अपार्टमेंटमधील फ्लॅट मधील कपाटातील दहा हजार रुपयाची रोकड चोरट्याने लंपास केली अन्य अन्य चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही याबाबत इन्फ्रान्स मार्टिन डिसोजा रा.जुनाबाजार हिने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना हालचाली तपासून पाहता आल्या नाहीत असे बोलले जात आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा