You are currently viewing नृत्य परिषदेतर्फे ‘लाखाची’ नृत्यस्पर्धा…

नृत्य परिषदेतर्फे ‘लाखाची’ नृत्यस्पर्धा…

नृत्य परिषदेतर्फे ‘लाखाची’ नृत्यस्पर्धा…

सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन:जिल्हा, विभाग आणि अंतिम फेरीत रंगणार स्पर्धा;

सिंधुदुर्गसाठीची प्राथमिक फेरी जुलै मध्ये..

कुडाळ

नृत्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आयोजित करण्यात आली आहे. अंतिम विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ५० हजार आणि २५ हजार अशी रोख पारितोषिके त्याच बरोबर ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र अशी भव्य बक्षिसे असणार आहेत. जिल्हा, विभाग आणि अंतिम फेरी अशा टप्प्यात आणि लहान व मोठा अशा दोन गटात हि स्पर्धा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयासाठीची प्राथमिक जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली असून त्या विषयी आणि संपूर्ण स्पर्धेच्या स्वरूपाविषयी नृत्य परिषद महाराष्ट्राचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राहुल कदम आणि कुडाळ तालुका अध्यक्ष भूषण बाक्रे यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा सचिव रोहित माने, तालुका खजिनदार सौ. अदिती दळवी, कोरिओग्राफर तुशांत सोनवणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल कदम म्हणाले, नृत्य परिषद महाराष्ट्र आयोजित ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आहे. महाराष्ट्र डान्स प्रीमियर लीग म्हणजेच MDPL या नावाने हि स्पर्धा ओळखली जाणार आहे. जिल्हास्तर, विभाग स्तर आणि अंतिम फेरी अशा टप्प्यात हि स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २५ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यामध्ये होणार असून त्यासाठी पवन टाक, वैष्णवी पाटील, शिवम वानखेडे, ऋतुजा जुन्नरकर, दीपक हरसुरे आणि श्वेता परदेशी असे नृत्य क्षेत्रातील सेलिब्रेटी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही संपूर्ण स्पर्धा लहान आणि मोठ्या गटामध्ये होणार आहे. सुरुवातीला जिल्हास्तरावर प्राथमिक फेरी होतील. त्यातून दोन्ही गटातून प्रत्येकी तीन विजेते काढले जातील. त्या विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येईल. जिल्हा स्तरावरचे सहा विजेते विभाग स्तरावर सहभागी होतील. हि उपांत्य फेरी असेल. एकूण सहा विभागातुन दोन्ही गटातून ३६ विजेते निवडले जातील. या सर्व विजेत्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र डान्स प्रीमियर लीगची महाअंतिम फेरी २५ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यात होणार आहे. त्यात विभाग स्तरावरचे ३६ स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये १ लाख, ५० हजार आणि २५ हजार तसेच ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. .
या स्पर्धेच्या जिल्हास्तर फेरीसाठी नावनोंदणी सुरु झाली असून स्पर्धकांनी फॉर्म भरून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रु. ५९०/- प्रवेश फी असून ती एकदाच जिल्हास्तर फेरीच्या वेळी ऑनलाईन भरायची आहे. विभाग आणि अंतिम फेरीसाठी प्रवेश फी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्राथमिक फेरी जुलै महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तर विभाग स्तरीय फेरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्याचे ठिकाण आणि वेळ स्पर्धकांना कळविले जाणार आहे. स्पर्धेविषयक अधिक माहिती आणि नियम यासाठी 8600143061 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राहुल कदम, भूषण बाक्रे, रोहित माने, अदिती दळवी आणि नृत्य परिषद महाराष्ट्र-सिंधुदुर्ग यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा