You are currently viewing नेमळे सातेरी पंचायतनाच्या पुनः प्रतिष्ठापनेचा १४ रोजी वर्धापन दिन

नेमळे सातेरी पंचायतनाच्या पुनः प्रतिष्ठापनेचा १४ रोजी वर्धापन दिन

नेमळे सातेरी पंचायतनाच्या पुनः प्रतिष्ठापनेचा १४ रोजी वर्धापन दिन

सावंतवाडी

नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनाच्या पुनः प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार १४ जून ते शनिवार १५ जून या कालावधीत संपन्न होत आहे. यानिमित्त श्री देवी सातेरी मंदिरात श्री सूक्त विधान सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त मंदिरात शुक्रवार १४ जून रोजी सकाळी ७ ते ११ शांतिपाठ, देवतांची प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, संभारदान, आचार्य वरण, प्रकारशुद्धी, देवता स्थापना, श्रीसूक्त विधान, ग्रहयाग आरती, तीर्थप्रसाद तर शनिवार १५ जून रोजी सकाळी ७.३० ते १२.३० आवाहीत देवता पूजन, श्री सूक्त विधान, हवन, बलिदान, पूर्णाहुती, आरती, महागाऱ्हाणे, तीर्थ प्रसाद व महाप्रसाद तसेच रात्रौ ठीक १० वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे.

या सोहळ्यास सर्व भाविक भक्तगण, देणगीदार, शिमधडे, पै पाहुणे यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपाप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा