You are currently viewing आयुष्याचे मर्म

आयुष्याचे मर्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्याचे मर्म*

 

 

दिवा तेवत ठेवावा

मनी खोल गाभाऱ्यात

अन्तर्मनातील तम

सारायचे बळ त्यात….१

 

घाल ममतेचं तेल

लाव सद्वर्तन वात

लख्खं उजळून टाक

तेजोमय मन आत….२

 

तमातून‌ तेजाकडे

निष्ठा विश्वासाने पहा

सकारात्मकता मनी

स्वप्ने साकारती महा….३

 

काम क्रोध मद हेवा

दूर सारून जगावे

देता येईल आनंद

समाधान देत जावे…४

 

सत्कर्माच्या वाटेवरी

निरपेक्षतेने चाले

भरे हो मनगाभारा

ज्याला मर्म समजले…५

 

©️®️ डॉ मानसी पाटील

मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा