You are currently viewing विजबाई

विजबाई

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विजबाई*

 

विजबाई आपली

कामाची कामाची.

रात्रंदिवस करत असते

सेवा ती जगाची.

 

 

पंखा, रेफरिजेरेटर चालवते

टीव्ही दाखवते.

आपल्या आवडत्या मोबाईल लाही

तिच कामाला लावते.

 

 

रेल्वेमधून कार्यालयात नेते.

तिच्यामुळेच लिफ्ट वर जाते.

अशी कितीतरी कामे

विजबाई करते.

 

 

तुम्ही मात्र विजेची

करता उधळपट्टी.

विनाकारण पैशांची

बसते मग चट्टी.

 

 

कशाला लावता पंखा ?

खिडक्या उघडा जरा !

बघा कशी हवा मग

येते भरभरा !

रेफरिजेरेटर पेक्षा माठातलं

पाणी किती छान.

थकवा पळतो दूर

भागते तहान !

 

 

विजबचतीचा मंत्र

सतत ध्यानात ठेवा.

विजबचत करा

घडेल देशसेवा

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा