*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम गीत रचना*
*वाढदिवस गीत*
आज घेऊनी आलो आम्ही जन्मदिनाच्या शुभेच्छा
लाभू दे सौख्य जीवनी ईश्वरचरणी इच्छा ॥ धृ ॥
आरोग्याचे वरदान मस्तकी राहू दे
आनंदाने दुथडी भरून गंगा दारी वाहू दे
हास्य सुमने मुखी फुलो हीच एक सदिच्छा
लाभू दे सौख्य जीवनी ईश्वरचरणी इच्छा ॥ १ ॥
कणाकणाने कले कलेने जीवन तुमचे उजळू दे
इच्छिलेले स्वप्न तुमचे सत्यामध्ये उतरू दे
समाधान अंतरी नांदावे प्रभू चरणी अपेक्षा
लाभू दे सौख्य जीवनी ईश्वरचरणी इच्छा ॥ २ ॥
तुमच्या कीर्तीचा ध्वज अंबरात फडकावा
तुमच्या नावाचा जयघोष चोहीकडे धडकावा
देवकृपेच्या दृष्टीची तुम्हा मिळावी दीक्षा
लाभू दे सौख्य जीवनी ईश्वर चरणी इच्छा ॥ ३ ॥
*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*