You are currently viewing देवदर्शन

देवदर्शन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देवदर्शन*

 

सख्या निघती मंदिरी

जपत नाम,चित्त पावन जयांचे

घेती प्रभाती प्रथम दर्शन

गणपती बाप्पा मोरयाचे….

मोसमी सुमने बहु बहरती

शृंगारिल्या आनंदे सर्व मूर्ती

जय गणेश,जय गजानन

ॐ गं गणपतयेनमः,जपे पूर्ती ….

 

मुखी वसे श्रीराम -जय श्रीराम

ब्रह्मचैतन्य सांगे नाम सार

भक्तीभावे बांधियेला साक्षात

परमात्मा निर्गुण निराकार ….

 

स्नान करता “हर गंगे” उच्चारती

शिवाभिषेके “ॐनमः शिवाय”

शेषशायीस सप्रेमे वंदन करुनी

“ॐ नमो भगवते वासुदेवाय” ….

 

विठ्ठल-विठ्ठल गात जावे

गाढ भक्ती हृदयांतरी

नित्य-एकादशीस भजावे

जय जय राम कृष्ण हरी ….

 

जय अंबे जयजय जगदंबे

ओटी भरती काव्यमाला अर्पून

विचारपुष्पे माळून कुंतली

चालू लागती क्षणभर विसावून ….

 

विजया केळकर_______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा