You are currently viewing हळवल येथील रस्त्यावरील कॉजवेचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

हळवल येथील रस्त्यावरील कॉजवेचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

हळवल येथील रस्त्यावरील कॉजवेचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप ; चांगल्या दर्जाचा पर्यायी रस्ता करण्याची मागणी

कणकवली

हळवल शिवराई मंदिराजवळ जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवेचे काम सुरु आहे. मात्र ते काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप करत हळवल ग्रामस्थानी बुधवारी ते काम बंद पाडले. तसेच चांगल्या दर्जाचा पर्यायी रस्ता तत्काळ तयार करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
जिल्हापरिषदच्या जिल्हा वार्षिक निधीतून ४३ लाखाचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला होता. या कॉजवेच्या कामाचा कार्यारंभ आदेश लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी देण्यात आला होता. मात्र,संबधित ठेकेदाराने ऐन पावसाच्या तोंडावर कामाला सुरवात केल्याने ग्रामस्थांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला आहे. मात्र, तात्पुरता पर्यायी रस्ता काढून ग्रामस्थांचा मार्ग खुला करण्यात आला. परंतु मागील दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे पर्यायी मार्गांवर पाणी साचून चिखल झाला आहे. त्यामुळे येण्याजाण्याचा मार्ग व्यवस्थित नाही. तसेच संबधित कॉजवेचे काम देखील चुकीच्या पद्धतीने व निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला आहे. त्यामुळे काम बंद पाडण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राणे, हळवल ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, रोहित राणे, प्रथमेश राणे, ओंकार मडवळ, अतुल राणे, सौरभ सावंत ,शंतनू राणे, विनय सावंत, सिद्धी राणे, विकास गुरव, विजय चव्हाण, नंदकुमार फणसळकर, प्रसाद पंडित, प्रशांत दळवी, दुर्गप्रसाद काजरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता प्रभू यांनी मंगळवारी कॉजवेच्या ठिकाणी भेट दिली होती.तसेच ठेकेदाराला पर्यायी रस्ता करण्यास सांगितले होते.मात्र,ठेकेदाराने पर्यायी रस्ता केलेला नाही.त्यामुळे मोठा पाऊस पडल्यास काही वाड्यांचा संपर्क तुटणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा