You are currently viewing वैभववाडी शहरात नागरिकांची गैरसोय नको : विकास कामे तात्काळ पूर्ण करा

वैभववाडी शहरात नागरिकांची गैरसोय नको : विकास कामे तात्काळ पूर्ण करा

वैभववाडी शहरात नागरिकांची गैरसोय नको : विकास कामे तात्काळ पूर्ण करा

आमदार नितेश राणे यांच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना

वाभवे – वैभववाडी न.पं. येथे विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न

वैभववाडी

वैभववाडी शहरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होता कामा नये. प्रलंबित विकास कामे तात्काळ पूर्ण करून घ्या. कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल. असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी वाभवे – वैभववाडी न. पं. च्या बैठकीत दिला. शहरात कोट्यावधीच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली आहेत. पुर्णत्वास गेलेली कामे देखील जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना आमदार राणे यांनी दिल्या.

वाभवे – वैभववाडी न. पं. शहरातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक येथील नगरपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे , माजी सभापती भालचंद्र साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, तालुका महीला अध्यक्ष प्राची तावडे, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, प्रदीप रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संतोष पवार, नगरसेविका सुंदरा निकम, संगीता चव्हाण, सुभाष रावराणे, त्याचबरोबर महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी अतुल शिवनिवार, सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी श्री. जोशी, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे व अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांनी शहरात झालेल्या संपूर्ण कामांचा यावेळी आढावा घेतला. जवळपास 25 विकास कामे ही पूर्णत्वास गेली असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले. वैभववाडी शहरातील गटारे, संभाजी चौक सुशोभिकरण महामार्ग नजीकची गटारे आदी प्रलंबित कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. ज्या ठेकेदारांच्या नावावर कामे आहेत. त्यातील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. कोणतेही कारण चालणार नाही. कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्याचबरोबर पूर्ण झालेल्या कामाबाबत प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे. जनतेपर्यंत सदर कामे पोहचली पाहिजे. ती कामे पोहचवण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

शहरातील शांतिनदी ते सुख नदी दरम्यानचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारित आहेत. या मार्गावरील गटारे तात्काळ साफ करून घ्या. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकारी अतुल शिवनिवार यांना दिल्या. येत्या दोन दिवसात महामार्गालगतची गटारे साफ केली जातील. असे शिवनिवार यांनी सांगितले.

तरेळे ते गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर सूरु असलेल्या रस्ता रुंदीकरण कामाचाही आमदार नितेश राणे यांनी आढावा घेतला. तर घाट मार्गे वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल यावेळी करण्यात आला. अजून कामे अपुरी असल्याने त्याच बरोबर दरडी वारंवार कोसळत असल्याने घाट मार्ग असुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामे तात्काळ पूर्ण करा आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी पुर्ववत करा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या.

*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा