You are currently viewing शहरातून नारायण राणेंना ऐतिहासिक लीड…

शहरातून नारायण राणेंना ऐतिहासिक लीड…

शहरातून नारायण राणेंना ऐतिहासिक लीड…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती ः शहरातील मतदारांचे नलावडेंनी मानले आभार..

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही उमेदवाराला शहरातून फारसे लीड मिळाले नव्हते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना 1717 एवढे ऐतिहासिक लीड मिळाले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकास झाल्याने शहरातील मतदारांनी राणेंना मताधिक्य दिले. याबद्दल शहरवासीय व माजी नगरसेवक, भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आभार मानले. विनायक राऊत यांच्या पराभव झाल्यानंतर नाईक बंधूंच्या पत्रकार परिषदाही बंद झाल्या आहेत, असा टोला नलावडे यांनी लगावला.
भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बॅंकेचे संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, अभय राणे, शिशीर परुळेकर, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, संजना सदडेकर, साक्षी वाळके आदी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना शहरातून लीड देण्याचा निर्धार शहरातील माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला होता. याकरिता शहरात त्यांनी राणेंचा जोरदार प्रचार केला. 4 जूनला जाहीर झालेल्या निकालात राणे हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले.
तत्कालीन केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांत कणकवली शहराच्या विकासासठी कोट्यवधींचा निधी मिळाला. या निधीमुळे शहरातील विकासांची कामे मार्गी लागली. याची पोचपावती म्हणून शहरातील मतदारांनी राणेंना मताधिक्य दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकासकामे मार्गी लावली. याबाबत मी आभार मानतो. राणेंच्या विजयासाठी माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच राणेंना शहरातील बूथवर मताधिक्य मिळाले, असे नलावडे यांनी सांगितले.

वैभव नाईकांनी शेवटची आमदरकी एॅजाय करावी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंना मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा दारुण पराभव होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या नाईक बंधूंच्या राऊतांच्या पराभवानंतर बंद झाल्या आहेत. वैभव नाईक यांची ही शेवटची आमदारकी असल्याने त्यांनी ती एॅजाय करावी, असा टोला बंडू हर्णे यांनी लगावला. वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांच्या पराभवासाठीच काम केले, असा गंभीर आरोप हर्णे यांनी केला.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा