You are currently viewing निषेध आणि निषेधच

निषेध आणि निषेधच

*वसईत घडलेल्या लांच्छनास्पद घटनेवर मेल्सिना तुस्कानो परेरा हीचा लेख*

 

*निषेध आणि निषेधच*

 

भारत देश तर स्वतंत्र झाला, पण त्या देशातील स्त्रीचे काय? तीला आहे का स्वातंत्र्य?

स्त्रियांच्या अब्रूला जेव्हा हात लागतो, तिच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार होतो तेव्हा म्हणता येईल का, की स्त्रीया आजही स्वातंत्र्य आहेत म्हणून रात्रीची वेळ सोडूनच द्या, पण आजच्या क्षणी ती भर दिवसा ही सुरक्षित नाही आहे. मग अश्यावेळी कोणत्या अर्थाने हा भारत देश स्वतंत्र झाला आहे? ह्या देशातील प्रत्येक स्त्री ही मणिपूरच्या घटनेने चवताळून गेली आहे, एक प्रकारची भीती आज स्त्रीयांच्या मनात आहे की, आज अशी घटना तिथे घडली आहे उद्या आमच्या गावात घडेल तर? मणिपूरची तर मोठी घटना होती, पण आजूबाजूला रोज अश्या कितीतरी प्रकारच्या घटना होत असतात. आज प्रत्यक्षात वसईत घटना घडली. आपल्याच स्त्रीला एक नराधम न घाबरता बिनधास्तपणे असे काही बोलून जातो की मनात विचार येतो अश्या वेळी मदत घ्यायची तरी कोणाची…. काय करावे? न्याय कसा मिळवावा?

ह्या सर्वातून माणूस किती भयानक आणि खालच्या नीच पातळीवर जातोय हे समजते. रोज कोणतेही वर्तमानपत्र उघडून बघा कुठे ना कुठे तरी स्त्रीयांच्या अत्याचाराबद्दल बातमी दिसत असते. देशात रोज कितीतरी स्त्रीयांच्या बाबतीत अन्याय घडत असतो आणि आपण म्हणतोय भारत स्वातंत्र्य झालाय. हेच का ते स्वातंत्र्य??

आज आपल्याच नाकाखाली आपल्याच भूमीत, आपल्याच परिसरात ही घटना घडली आहे. काय म्हणावे अश्या वेळी???

परकीयांच्या गुलामगिरीतून भारत देश आजाद झाला पण महिला आजही स्वदेशीच्या गुलामगीरीत, स्वदेशीच्या अन्यायाखाली दबून आहेत. आणि आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला. आज शहरातील स्त्रीया स्वतः साठी लढत आहेत, पण गावातील महिलाचें काय? त्यांना लढण्यास कोण शिकवणार? चूल आणि मूल पदरी देऊन दारू पिऊन मारहाण करणाऱ्या नवर्या पासून, हुंडा बळी पासून तिला कोण वाचवणार? आज स्त्रीया स्वतः च्या हक्कासाठी बोलू लागल्या की लगेच त्यांना गप्प केले जाते. तिला स्वतंत्र मिळाले आहे, ती कसेही कपडे घालते etc. आम्हाला कोणते स्वातंत्र्य हवे आहे आणि समाज आमच्या बद्दल काय विचार करतोय ताळमेळच नाहीय काही.

 

कितीही मोर्चा काढा, मेणबत्ती पेटवा, की मौन धारण करा काय फरक पडणार?? मोर्चा नाही तर अश्या नराधमांना भर चौकात नग्न करून वरात काढली पाहिजे. मग समजेल लज्जा काय असते ती. निलंबित, तडीपार केले पाहिजे. न्यायालयाने जिथे सूर्यप्रकाश येणार नाही इतक्या काळोख्या कोठडीत कारावास द्यावयास हवा..

अरे ज्या दिवशी देशात दिवसाला, तासाला, आणि मिनिटाला एकही बलात्कार, अत्याचार, अन्याय होणार नाही ना, फक्त महिला दिनाच्या निमित्ताने नव्हे तर रोज महिला म्हणून तिला आदर, सन्मान मिळेल. रात्री 10 वाजताही ती मोकळ्या मनाने वावरू शकेल त्या दिवशी मी मान वर करून सांगेन की आज माझा भारत खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य झाला आहे.

 

वसईत झालेल्या ह्या प्रकाराला योग्य तो न्याय मिळायलाच पाहिजे त्या नराधमाला न्यायालयीन शिक्षा तर व्हायलाच हवी पण लोकांकडूनही शिक्षा व्हायला पाहिजे. तोंडाला काळे फासले पाहिजे ह्या माणसाच्या… आणि त्याला बचाव करण्या साठी जितकी लोकं मध्ये येतील त्यांना ही कारावास झाला पाहिजे… आता वेळ बोलण्याची नाही लढण्याची आहे

 

©

मेल्सीना तुस्कानो परेरा

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा