कणकवली :
कणकवली तालुक्यातील कलमठ सुतारवाडी येथील रहिवाशी व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कणकवली कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री वय वर्षे ६२ यांचे आज सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते कणकवलीतील खाजगी रुग्णालयात तपासणी करण्याकरता गेले होते. मात्र या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे ते वडील होत.