You are currently viewing गोपुरी आश्रमाला अस्मि कृतज्ञता सन्मान पुरस्कार…

गोपुरी आश्रमाला अस्मि कृतज्ञता सन्मान पुरस्कार…

गोपुरी आश्रमाला अस्मि कृतज्ञता सन्मान पुरस्कार…

कणकवली

मुलुंड-मुंबई येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘अस्मि’ प्रतिष्ठानचा आस्मता जयप्रकाश लब्दे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’ हा पुरस्कार गोपुरी आश्रमास प्राप्त झाला. सदर सन्मान प्रतिष्ठानतर्फे गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर व सचिव विनायक मेस्त्री यांच्याकडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश लब्दे यांनी सुपूर्द केला. 25 हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी दिनेश पडवेकर, आशालाता पडवेकर, सदाशिव राणे, श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते. गोपुरी आश्रमामार्फत सातत्याने सुरु असलेल्या सामाजिक उपक्रम व रोजगार विषयक कार्याचा गौरव व्हावा याकरिता हा पुरस्कार गोपुरी आश्रमाला देताना मला आनंद होत आहे, असे उद्गार लब्दे यांनी काढले.
गोपुरी आश्रमाला 76 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरू केलेली गोपुरी आश्रम ही संस्था आजही कार्यरत आहे. वर्तमान व भविष्यकाळातील पिढीला संस्काराच्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी गोपुरी आश्रमासारख्या संस्था भविष्य काळात सातत्याने कार्यरत राहायला हव्यात यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या आश्रमाला आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकार्य करायला हवे, असे आवाहन लब्दे यांनी केले. या पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्रमाचे सर्वस्तरांतून कौतूक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा