You are currently viewing केवळ आश्वासने नको, करणार कधी ती वेळ सांगा: आक्रमक वीज ग्राहकांचा अधिकाऱ्यांना सवाल

केवळ आश्वासने नको, करणार कधी ती वेळ सांगा: आक्रमक वीज ग्राहकांचा अधिकाऱ्यांना सवाल

*केवळ आश्वासने नको, करणार कधी ती वेळ सांगा: आक्रमक वीज ग्राहकांचा अधिकाऱ्यांना सवाल*

*वीज ग्राहक संघटनेच्या जागृतीमुळे ग्राहक हक्कांसाठी उठताहेत पेटून*

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मडूरे, कास, रोनापाल, निगुडे, सातोसे, आरोस, मळगाव, तळवडे आदी गावांमधील लोकप्रतिनिधींनी सोमवारी सकाळी ११.०० वाजता सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना घेराव घातला आणि नुसती वीजबिले वसुली नको तर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था सुधारा अशी मागणी केली. यावर अभियंता चव्हाण यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असता, “आश्वासने नकोत कधी करणार ती तारीख सांगा. वीज व्यवस्था न सुधारल्यास वीज बिले भरणार नाहीत असा इशारा दिला. यावेळी वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सुरेश गावडे मा.सरपंच रोनापाल, लक्ष्मण निगुडकर सरपंच निगुडे, शांताराम गावडे मा.सरपंच निगुडे, मडूरा उपसरपंच बाळू गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, तळवडे तंटामुक्ती अध्यक्ष बाळा जाधव, गुरुदास गवंडे मा.उपसरपंच निगुडे, पुंडलिक दळवी वीज ग्राहक संघटना सदस्य आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांच्या हक्कासाठी गेले वर्षभर विविध माध्यमातून महावितरणच्या विरोधात संघर्ष करीत आहे. महावितरणकडून चांगली सुविधा, ग्राहकांचे हक्क मिळवण्यासाठी आंदोलने, उपोषणे, निवेदने देत आहे. सावंतवाडी तालुका संघटना यात अग्रेसर असून तालुकाध्यक्ष संजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहे. परंतु तरीही काही अकार्यक्षम अधिकारी वर्गांमुळे जिल्ह्याची वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. मान्सून पूर्व झाडी तोडणे, लाईनची दुरुस्ती, आदी कामे करून वीज वितरण व्यवस्था सुस्थितीत आणणे, आदी कामे प्रलंबित ठेवल्याने डोंगराळ भागातून जाणाऱ्या वीज वाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होत आहेत. गंजलेले जुनाट पोल वाऱ्या पावसात मोडून पडत आहेत. जुनाट तारा तुटून अपघात होत आहेत. तळवडे पंचक्रोशीत नेहमीच कमी दाबाने वीज पुरवठा होतो. यावर तोडगा म्हणून निरवडे येथे सबस्टेशन प्रस्तावित होते परंतु स्वस्त जागा मिळविण्याच्या प्रयत्नात महावितरणला जागा उपलब्ध होत नाही. मळगाव येथे देखील जागेचे भाव वाढल्याने अडथळा येतो. वेत्ये येथे जागा आहे परंतु जागेच्या बदल्यात भाडे देण्यास महावितरणने नकार दिल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला असून सबस्टेशन होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी छोटे मोठे उद्योगधंदे आणि मोठी व्यापारी बाजारपेठ असलेली तळवडे पंचक्रोशी अनेक समस्या अंगावर घेऊन वावरत आहे आणि महावितरणचे अधिकारी हात वर करून मोकळे होतात.
बांदा येथून मडुरे पासून आरोस, कास, सातोसे पर्यंत जाणाऱ्या वीज वाहिनी मध्ये वारंवार बिघाड आहे. त्यामुळे मळेवाड सबस्टेशन मधून इन्सुली चेकनाका पर्यंत पर्यायी जोडणी करून द्यावी अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी केली. वीज वाहिन्यांना लागणारी झाडे तात्काळ सर्व्हे करून गावातील लोकांना रोजंदारीवर घेऊन तोडून लाईन मोकळी करा ही मागणी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी मान्य करून उद्या येऊन सर्व्हे करतो आणि लोकांची रोजंदारी देखील देण्याची जबाबदारी घेत मान्य केली. त्यामुळे वीज ग्राहक संघटना व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच लोकप्रतिनिधींनी चार दिवसात योग्य उपाययोजना न झाल्यास परिणाम भोगायला तयार रहा असा सज्जड दम देत अभियंता चव्हाण यांनी भेट देण्याचे मान्य केल्यावर घेराव मागे घेतला.
यावेळी वीज ग्राहक संघटना सदस्य संतोष तावडे ओटवणे, मनोज घाटकर कुणकेरी, भगवान परब रोनापाल, मोहन गवस, अनिल यशवंत नाईक आरोस, श्रीराम आगरवाडेकर अनिल परब, गौरव मेस्त्री उपसरपंच तळवडे आदी वीज ग्राहक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा