You are currently viewing पाडलोस रस्त्याचे काम घाईगडबडीने केल्याने साईड पट्टी धोकादायक – समीर नाईक

पाडलोस रस्त्याचे काम घाईगडबडीने केल्याने साईड पट्टी धोकादायक – समीर नाईक

पाडलोस रस्त्याचे काम घाईगडबडीने केल्याने साईड पट्टी धोकादायक – समीर नाईक

अपघात घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार…

बांदा

पाडलोस-मडुरा येथून बांदा येथे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पाऊसात व घाईगडबडीने केल्यान साईड पट्टी धोकादायक बनली आहे. तसेच त्या ठिकाणी टाकण्यात आलेले दगड जैसे थेच आहेत. त्यामुळे अपघात घडल्यास त्याला संबंधित अधिकार जबाबदार असेल, असा इशारा ठाकरे शिवसेना मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी दिला.

याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, पाडलोस मडुरा मार्गावरील पाडलोस येथे रस्त्याचे काम घाईघाईने करण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी निर्धोक करण्यासाठी दगडही टाकण्यात आले, मात्र सद्यस्थितीत ते दगड धोकादायक ठरत असल्याने साईडपट्टीही धोकादायक बनली आहे. संबंधित काम तात्काळ करावे, अन्यथा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा