शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कु. तनुश्री प्रमोद पिवटे हीचा नुकताच सत्कार करण्यात आला. तिने नुकतीच नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 619 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं. तिने ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून हे यश संपादन केलेल आहे. या यशाबद्दल तिचा नुकताच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर तसेच फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर आदींनी श्री प्रमोद पिवटे यांच्या निवासस्थानी जाऊन कु. तनुश्रीचा शाल, श्रीफळ व पेढा भरून नुकताच सत्कार केला. ती आदर्श ग्रामसेवक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे सचिव श्री प्रमोद पिवटे व आदर्श शिक्षिका सौ. छायाबाई पिवटे यांची सुकन्या आहे. याप्रसंगी डॉ. दिवाकर पाटील व सौ. पाटील मॅडम सुद्धा उपस्थित होते. प्रसंगी कु.तनुश्रीचे तसेच तिच्या आई-वडिलांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. तीच्या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.