You are currently viewing वनविभाग आणि रेडी माईन्सच्या वतीने जागतिक पर्यावरणदिन साजरा

वनविभाग आणि रेडी माईन्सच्या वतीने जागतिक पर्यावरणदिन साजरा

वनविभाग आणि रेडी माईन्सच्या वतीने जागतिक पर्यावरणदिन साजरा

वेंगुर्ला :

वनविभाग-सावंतवाडी, वनपरिक्षेत्र-कुडाळ व वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिब, काजू प्रजातिची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, ऑपरेशन महाराष्ट्र राज्याचे प्रमोद सरोदे, गोगटे मिनरल्सचे श्रीनिवास राव, संजय भंडारे आदी उपस्थित होते. वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी यावर्षीच्या ‘जमिन पुनर्संचित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळी प्रतिकारशक्ती‘ या थीमबाबत माहिती दिली. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. वनपाल मठ यांनी यावर्षीच्या पर्यावरण दिवसाचे घोषवाक्य ‘आमची जमिन, आमचे भविष्य आम्ही आहोत‘ असल्याचे सांगितले.

मठ येथील शासकीय वन कक्ष क्र. १३६ मधील मोकळ्या भागात कोकमची ४०, आवळा ३०, जांभुळ ३० अशी एकूण १०० फळझाडांची लागवड केली. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, मठ वनसेवक शंकर पाडावे व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा