You are currently viewing आंबोलीत येणार्‍या प्रवासी, पर्यटकांच्या जीवाशी खेळणे बंद करा – सावित्री पालयेकर

आंबोलीत येणार्‍या प्रवासी, पर्यटकांच्या जीवाशी खेळणे बंद करा – सावित्री पालयेकर

आंबोलीत येणार्‍या प्रवासी, पर्यटकांच्या जीवाशी खेळणे बंद करा – सावित्री पालयेकर

घाटातील झाडे पडण्यास वन व बांधकाम विभाग जबाबदार…

आंबोली

येथील घाट रस्त्यावर झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. धोकादायक झाडांबाबत सर्व्हे करून सुध्दा ती तोडली नसल्याने हे प्रमाण वाढले आहे. दरम्यान याला सर्वस्वी बांधकाम व वनविभाग कारणीभूत आहे, असा आरोप आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केला असून प्रवासी आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळणे बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, दरवर्षी आंबोली घाटात झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची विनंती करून सुद्धा संबंधित विभागांकडून दुर्लक्ष केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्याला संबंधित विभाग जबाबदार राहील, असे त्या म्हणाल्या. दरम्यान लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करून तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सौ. पालेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा