You are currently viewing १२ जून रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामार्फत व्यावसायिक फूड व्हॅनचे उद्घाटन

१२ जून रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामार्फत व्यावसायिक फूड व्हॅनचे उद्घाटन

*१२ जून रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामार्फत व्यावसायिक फूड व्हॅनचे उद्घाटन*

वैभववाडी

आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी यांचे मार्फत कोकण कन्या योजनेअंतर्गत करिअर कट्टा विभागाकडून व्यावसायिक
फूड व्हॅनचा उद्घाटन समारंभ १२ जून २०२४ रोजी होणार आहे. महिलांना व्यवसायामध्ये सक्षम बनविण्यासाठी करिअर कट्टा विभागामार्फत कोकण कन्या योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विद्यार्थिनीना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांचेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील एकूण सहा विद्यार्थिनींना हॉटेल मॅनेजमेंटचे दीड महिन्याचे प्रशिक्षण विवा कॉलेज विरार येथे मोफत देण्यात आलेले आहे. हे प्रशिक्षण कु.सायली कांबळे, कु. जानवी कांबळे, कु.नम्रता पांचाळ, कु.अंजली समजिसकर, कु.ललिता मिरासी व कु.कोमल आग्रे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. तसेच या लाभार्थी विद्यार्थिनींना व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी साधारणतः साडेआठ लाख रुपयाची सर्व सोयींनी सुसज्ज अशी फूड व्हॅन १०० % अनुदानित तत्त्वावर देण्यात आलेली आहे. या फुड व्हॅनच्या मदतीने सर्व लाभार्थी विद्यार्थिनी कोकणातील समुद्री खाद्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करणार आहेत. या उत्कृष्ट पदार्थांकडे संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करिअर कट्टा विभाग या व्यवसायाची संपूर्ण महाराष्ट्रभर जाहिरात करणार आहे. या फुड व्हॅन ची सुरुवात दिनांक १२ जून २०२४ रोजी सकाळी १२ वाजता वैभववाडी बाजारपेठ येथे होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी वैभववाडी परिसरातील अनेक मान्यवर, महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सर्व प्राध्यापक वर्ग, नागरिक व पत्रकार उपस्थित राहणार आहेत. १२ जून पासून ही फूड व्हॅन वैभववाडी करांच्या सेवेसाठी सुसज्ज राहणार आहे. आपल्या कोकण कन्यांच्या सक्षमीकरणासाठी महाविद्यालयाकडून होत असलेल्या या प्रयत्नाला वैभववाडी व परिसरातून प्रोत्साहन मिळावे, उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा, अशी सदिच्छा महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी एस काकडे यांनी व्यक्त केली आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा