तळाशील खाडीकिनारी होडी उलटून बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह सापडला ; दुसऱ्याचा शोध सुरु
मालवण :
तळाशील खाडी किनारी मच्छीमारी पातनौका बुडाली असून दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले होते. यातील धोंडीराज परब (वय 55, मूळ रा. तारकर्ली) यांचा मृतदेह आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सापडला आहे. तर किशोर महादेव चोडणेकर (वय 55) यांचा शोध अद्यापही सुरु आहे. ही दुर्घटना शनिवार ८ जून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
मालवण पोलिसांनी दिलेल्या महिनानुसार किशोर महादेव चोडणेकर, मुलगा लावण्य किशोर चोडणेकर दोन्ही रा. तळाशील मालवण आणी धोंडीराज परब हे तिघे 8 जून रोजी सायंकाळी उशिरा तळाशील खाडीमध्ये पात नौका घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. सर्जेकोट तळाशील समोर होडी असताना असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे होडी नदीत (खाडीत) उलटल्याने तिघेही जण पाण्यामध्ये पडले. होडीतून पाण्यात पडलेल्या तिघांपैकी लावण्य किशोर चोडणेकर या मुलाने पोहत पोहत तळाशील किनारा गाठला. तर किशोर चोडणेकर व धोंडीराज परब हे दोघेही पाण्यामध्ये बेपत्ता झाले होते. पाण्यात बुडालेल्या दोन्ही मच्छिमारांचा पोलीस आणी स्थानिक ग्रामस्थांकडून शोध सूरू आहे, यातील धोंडीराम परब यांचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.